बेगडी धर्मनिरपेक्षतावादी, प्रसारमाध्यमे आणि संघटनांमुळे हिंदूविरोधी कोर्टबाजी; दंगलीतील ३५ आरोपींची निर्दोष मुक्तता

19 Jun 2023 20:05:06
Session Court On Gujarat riots

नवी दिल्ली (पार्थ कपोले) :
गोध्रा कांडानंतर झालेल्या गुजरात दंगलीमध्ये विविध क्षेत्रातील प्रमुख हिंदू व्यक्तींना गोवण्यात आले. त्यांच्याविरोधात छद्म-धर्मनिरपेक्ष माध्यमे आणि संघटनांनी धिंगाणा घातला, ज्यामुळे आरोपींना विनाकारण दीर्घकाळ कोर्टबाजीस सामारे जावे लागले, असा निकाल देऊन गुजरातमधील एका न्यायालयाने ३५ हिंदूंची मुक्तता केली आहे.

गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील हलोल येथील सत्र न्यायालयाने न्यायालयाने गत सोमवारी २००२ सालच्या गोध्रा दंगलींशी संबंधित चार प्रकरणांमध्ये सर्व ३५ जिवंत आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणांमध्ये, सुरुवातीला ५२ व्यक्तींवरदोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १७ जणांचा २० वर्षे चाललेल्या खटल्याच्या प्रलंबित कालावधीत मृत्यू झाला होता.

याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्ष बाळकृष्ण त्रिवेदी यांनी निकाल दिला. आपल्या ३६ पानांच्या निकालपत्रात त्यांनी नमूद केले केली, पोलिसांनी या प्रकरणात डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, व्यापारी, पंचायत अधिकारी अशा समाजातील प्रमुख हिंदू व्यक्तींना विनाकारण गोवण्याचे काम केले. त्यामुळे त्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन खटल्याचा सामना करावा लागला. या प्रकरणात आरोपी हे विशिष्ट समुदायाच्या एनजीओला घाबरत असल्याचेही दिसून आले आहे. या खटल्यात सरकारी वकिलांनी अधिकाधिक साक्षीदारांना बोलावून खटला विनाकारण लांबवला आहे. आरोपी व्यक्तीकडून शस्त्रे जप्त करणे आणि त्यामुळे दंगल होणे, हे स्वतंत्र साक्षीदारांद्वारे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला आहे. दंगलीच्या कथित गुन्ह्यात ३५ आरोपींपैकी एकालाही गोवण्याचा कोणताही प्रत्यक्ष पुरावा नाही. याप्रकरणी जवळपास प्रत्येक साक्षीदाराची साक्ष ही खोटी असल्याचेही गंभीर ताशेरे न्यायालयाने निकालात ओढले आहेत.

बहुमतालाच दोषी ठरविले जाते – न्यायालय

न्यायालयाने आपल्या निकालामध्ये प्रख्यात गुजराती लेखक कन्हैयालाल मुन्शी यांच्या लिखाणाचा संदर्भ दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, मुन्शी यांनी यांनी म्हटले आहे की; “जर प्रत्येकवेळी आंतरसामुदायिक संघर्ष होत असेल तर प्रश्नाच्या गुणवत्तेची पर्वा न करता बहुसंख्यांना दोषी ठरविले जाते”. प्रस्तुत प्रकरणातही कथित अपराधासाठी अशाचप्रकारे गोवण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

गुजरात दंगलीचा बुरखा फाटण्यास प्रारंभ

गुजरात दंगलप्रकरणी देशातील कथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या कंपूने प्रसारमाध्यमे, एनजीओ आणि प्रशासनातील काही लोकांना हाताशी धरून हिंदू समाजाला दीर्घकाळ बदनाम करण्यात आले होते. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यात गोवण्यासाठी तर तीस्ता सेटलवाड ही कथित समाजसेविका काँग्रेसचे दीवंगत नेते अहमद पटेल यांच्याकडून पैसे घेत असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे आता तब्बल २० वर्षांनी हिंदू समाजावरील हा डाग पुसला जाण्यास प्रारंभ झाला आहे.

Powered By Sangraha 9.0