म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे १७ जून रोजी लाईव्ह वेबिनार

16 Jun 2023 16:59:41
Mumbai MHADA Online Application Process Webinar

मुंबई
: म्हाडाच्या ऑनलाईन सोडतींसाठी अर्जदारांना अधिक सुलभतेने अर्ज सादर करता यावा, याकरिता म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे दिनांक १७ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता लाईव्ह वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ४०८२ सदनिकांच्या विक्रीसाठी दि. २२ मे २०२३ पासून म्हाडाचे संकेतस्थळ व मोबाइल App द्वारे ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

दरम्यान, म्हाडाच्या सोडतीसाठी यापूर्वी व सध्या चालू असलेल्या सोडतीसाठी ज्या अर्जदारांनी नोंदणी केली आहे त्यांनी lottery-webinar.mhada.gov.in या लिंकवर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी केलेल्या अर्जदारांना एसएमएसद्वारे व म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावरही Live Webinar ची Link उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. इच्छुक अर्जदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0