"राऊत कॉलिंग राऊत : रचला धमकीचा बनाव, गँगस्टरला कुठली एवढी अक्कल!"

15 Jun 2023 12:25:28
Sandeep Deshpande on Sanjay Raut

मुंबई : संजय राऊत धमकीप्रकरणी दि. १५ जून रोजी मयुर शिंदेंना अटक केली आहे. राऊतांनी स्वतां:ची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. मयूर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत धमकी प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस तपासात मयूर शिंदेने हा बनाव रचल्याचे उघडकीस आले. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांनी स्वता:हून बनाव रचल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, "राऊतांना धमकी देण्याची अक्कल गँगस्टरला कुठली येतयं"
 
सुनील राऊत आणि संजय राऊत यांनी हा बनाव रचला नाही. मयुर शिंदेने राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी धमकीचे फोन करण्यास सांगितल्याचे बोलले जात आहे. मात्र या प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊत आणि सुनील राऊतांचे गॅगस्टर लोकांशी संबध आहेत. त्यामुळे संजय राऊत हे स्वतांहून धमकीचा बनाव रचत आहेत. तसेच संदीप देशपांडेंनी स्वतःवर झालेल्यातील हल्ल्यातील पराडकर नावाचा आरोपी ही सुनील राऊतांच्या जवळता व्यक्ति असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राऊत हे राजकारणी आहेत की गॅगस्टर? , असा प्रश्न देशपांडेंनी उपस्थित केला आहे.
Powered By Sangraha 9.0