खोटं बोलणं राऊतांच्या रक्तातच!

15 Jun 2023 12:42:30
 
Nitesh Rane
 
 
मुंबई : खोटं बोलणं राऊतांच्या रक्तातच आहे, असं आ. नितेश राणे यांनी म्हटलं आहे. राऊत धमकी प्रकरणात मयुर शिंदेला अटक करण्यात आली आहे. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय आहे. राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी मयुर शिंदे याने धमकीचा कट रचला होता. या संपूर्ण प्रकरणावर आता नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
नितेश राणे म्हणाले, “राऊतांनी कार्यकर्त्याला धमकी देण्यास सांगून फोन रेकॉर्ड केला आहे. खोटं बोलणं हे राऊत यांच्या रक्तात आहे. संजय राऊत दाऊदपासून सगळ्यांची भाषा करतो. म्हणून मी याला भांडुपचा देवानंद म्हणतो. स्वत:च्याच कार्यकर्त्याकडून स्वत:लाच धमकी द्यायचा कॉल करवून घ्यायचा आणि आपल्याला धमकी मिळाल्याचं सांगून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची. हा संजय राऊत लवकरच तुम्हाला जेलमध्ये दिसणार आहे.”
 
"संजय राऊतांसारख्या खोटारड्या लोकांचं महाराष्ट्र सरकारने दिलेलं संरक्षण काढून टाकावं. यापुढे संजय राऊतवर महाराष्ट्रानं किती विश्वास ठेवावा, याबद्दल खरंच विचार करावा लागेल. जो स्वत:च्या मालकाचा झाला नाही, स्वत:च्या धर्माचा झाला नाही तो तुमचा-आमचा काय होणार हे विचारावं महाराष्ट्रानं." अशी टीका राणेंनी केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0