हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवर; मुलगा नाविद मुश्रीफची चौकशी होणार

15 Jun 2023 20:27:35
Navid Mushrif Inquiry Enforcement Directorate

मुंबई
: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. कोल्हापूर बँकेसह इतर अनेक प्रकरणांमध्ये चौकशीचा फेरा मुश्रीफ यांच्या भोवती आवळलेला असताना त्यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची आता चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर येथील संताजी घोरपडे साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत ईडीने मुश्रीफ यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करत कुटुंबियांसह निकटवर्तीयची चौकशी केली होती. त्यातच आता मुश्रीफ यांच्या मुलाची चौकशी होणार असल्याने नवे कोणते खुलासे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Powered By Sangraha 9.0