"माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे…" आव्हाडांचं खोपकरांसाठी ट्विट!

15 Jun 2023 12:47:57
 
Jitendra Awhad
 
 
मुंबई : मनसे कार्यकर्त्यांनी दादरमध्ये लावलेल्या एका बॅनरवरून जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना टोला लगावला होता. त्यावरून अमेय खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांवर केलेल्या टीकेनंतर त्याला आता आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे…" असं म्हणत आव्हाडांनी टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे.
 
जितुद्दीन आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे. हे कोण बोललं होतं हे सगळ्यांनाच आठवतच असेल. आता नागच तो, फणा काढतच फिरणार. पण कितीही फुत्कार निघाले तरी आम्ही मनसैनिक बिनकामाच्या नागाला अजिबातच महत्त्व देत नाही. असं ट्विट अमेय खोपकरांनी केलं होत.
 
 
 
यावर प्रत्युत्तर देताना आव्हाड म्हणाले, "माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे … हे कोण बोलले होते हे सगळयांना आठवत असेलच.. पण त्याला मी दिलेले उत्तर पण लोकांना आठवत आणि गदगदुन हसतात…माझा चेहरा नागाच्या फण्या सारखा आहे मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागा सारखा आहे सांगू का ..बघा अर्ष्यात…जश्यास तसे उत्तर कुणालाही देतायेतात… लवकर बरा हो."
 
 
Powered By Sangraha 9.0