भारताचे शिष्टमंडळ थेट द अॅनेसी इंटरनॅशनल अॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये!

15 Jun 2023 13:57:57

India's delegation at The Annecy International Animation Festival
 
नवी दिल्ली : भारत या वर्षी प्रथमच द अॅनेसी इंटरनॅशनल अॅनिमेशन फेस्टिव्हल (एआयएएफ) मध्ये सहभागी झाला आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ एआयएएफमध्ये गेले आहे. भारत अलीकडे व्हीपीएक्स आणि अॅनिमेशन बनवण्याच्या क्षेत्रात प्रगती करत आहे.

एका अहवालानुसार २०२४ पर्यंत भारतात व्हीपीएक्स आणि अॅनिमेशनचे उत्पादन १८० अब्ज रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसमोर या क्षेत्रातील आपली क्षमता प्रदर्शित करण्यासाठी या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला आहे. भारताच्या सहभागाविषयी बोलताना चंद्रा म्हणाले, "भारतातील अॅनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कॉमिक्स क्षेत्र जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरुन प्रतिभावान व्यावसायिकांच्या मदतीने प्रगती करत आहे.

महोत्सवात, चंद्रा यांनी द अॅनेसी इंटरनॅशनल अॅनिमेशन फेस्टिव्हलचे संचालक मायकेल मारिन यांची भेट घेतली. भारतात अॅनिमेशन चित्रपट महोत्सव आयोजित करण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यातील सहकार्याच्या संभाव्यतेवर चर्चा केली. याशिवाय, चंद्रा यांनी इतर देशांतील प्रतिनिधींशी संवाद साधला आणि अॅनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कॉमिक्स या क्षेत्राशी संबंधित मंत्रालयाच्या विविध उपक्रमांविषयी चर्चा केली, या क्षेत्रातील व्यवसाय सुलभतेसाठी भारत सरकार प्रोत्साहन देत आहे.

Powered By Sangraha 9.0