केंद्र सरकारची सर्वसामान्यांना मोठी भेट!

15 Jun 2023 17:26:10
oil
 
नवी दिल्ली :  केंद्र सरकारच्या एका निर्णयाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क गुरुवारपासून कमी केले आहे. यामुळे आगामी काळात देशांतर्गत बाजारात तेलाचा पुरवठा वाढण्यास मदत होणार असून, त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती घसरण्याची शक्यता आहे.
 
सरकारने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क १७.५ टक्क्यांवरून १२.५ टक्के केले आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. आयात शुल्कातील या कपातीमुळे आता रिफाइंड खाद्यतेलावरील आयात शुल्क १३.७ टक्क्यांवर आले आहे. यामध्ये समाजकल्याणासाठी आकारण्यात येणारा उपकर (सेस) देखील समाविष्ट आहे.
 
देशात कच्या सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. त्यानंतर या तेलाला रिफाइंड केले जाते. यंदा भारतात मान्सून उशिरा पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0