म्यानमार ही करणार भारतीय चलनात व्यापार!

14 Jun 2023 11:30:17
Myanmar will trade in Indian currency 1
 
नवी दिल्ली: जागतिक व्यापारात भारतीय रुपयाच वर्चस्व वाढत आहे. आता आणखी एका देशाने भारतीय रुपयांत व्यापार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताचा शेजारी असलेल्या म्यानमारच्या वाणिज्य मंत्री आंग नैंग ऊ यांनी जून अखेरपर्यंत दोन्ही राष्ट्रांमधील व्यापार स्थानिक चलनात होण्याची व्यवस्था पुर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
 
अमेरिकेच्या निर्बंधांचा फटका बसलेला म्यानमार वस्तू आयात करण्यासाठी पुरेसे परकीय चलन मिळवू शकत नाही. त्यामुळे म्यानमारला व्यापार करण्यात अडचण येत होती. आता दोन्ही देश रुपयात व्यापार करणार असल्यामुळे देशांमधील व्यापाराचे प्रमाण दुप्पट होईल.
 
वाणिज्य मंत्री आंग नैंग ऊ म्हणाले की, "भारतातील पीएनबी बॅक आणि म्यानमारच्या सेंट्रल बँक यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत आणि या महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. एकदा ही व्यवस्था सुरू झाल्यानंतर, दोन्ही देशांमधील व्यापाराचे प्रमाण दुप्पट होईल".
 
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ७७५.११ दशलक्ष अमेरिकन डॉलर गुंतवणुकीसह भारत हा म्यानमारचा अकरावा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. म्यानमारकडून भारत धातू, नैसर्गिक रबर, प्लायवूड, मासे, मसूर आणि कपडे यांची आयात करतो तर भारत म्यानमारला फार्मास्युटिकल्स, पेट्रोलियम उत्पादने, रसायने, यंत्रसामग्री, कॉफी आणि चहा यांची निर्यात करतो. म्यानमारच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचा वाटा पाच टक्के आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0