कट्टरपंथींनी ठेवला टीपूचा स्टेटस, म्हणे "भारत का राजा!"

13 Jun 2023 12:08:42
 
Kagal
 
 
कोल्हापुर : कागल शहरातील एका रहिवास्याने टीपु सुलतानच्या फोटोला 'भारताचा राजा' या कॅप्शनसह सोशल मीडिया स्टेटस म्हणून ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ११जून रोजी संध्याकाळी या स्टेटसचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी कागल पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आणि त्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली. चौकशीनंतर पोलिसांनी २९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे.
 
 
 
तसेच, हिंदुत्ववादी संघटनांकडून कागल बंदची हाक देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेत बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरात एकच दंगल उसळली होती. या घटनेला आठवडा पूर्ण होत नाही तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात पुन्हा असा प्रकार घडला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0