मुंबई : शिवसेना वर्धापन दिनाचे दोन सोहळे येत्या १९ जून रोजी पाहायला मिळणार आहेत. यासाठी शिंदे- ठाकरे दोन्ही गट कामाला लागले आहेत. शिवसेनेच्या इतिहासांत पहिल्यांदा असे दोन वर्धापन दिन साजरे केले जाणार आहेत. तसेच, वर्धापन दिनावरून मातोश्रीबाहेर शिंदे-ठाकरे गटात बॅनरवॉर देखाल सुरु आहे. 'बाळासाहेबांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार.' असं शिंदेच्या गटाच्या बॅनरवर लिहण्यात आलं आहे. मातोश्रीच्या रस्त्यासमोर आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरच्या अगदी बाजूलाच बॅनर लावला आहे.
या वर्धापन दिनाची तयारी ठाकरे गटाकडून आधीच करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकानाथ शिंदे आणि त्यांचे आमदार देखील या वर्धापन दिनाच्या तयारीला लागले आहेत. यंदाचा वर्धापन दिन हा आंनदोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी याआधीच त्यांच्या जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. तर शिंदेंनीदेखील बैठक बोलावली आहे.