श्रीचंडी सिद्धपीठात घुसून नमाज अदा करणाऱ्या अन्वरला अटक! अन्वर म्हणतो, "मंदिराला बॉम्बने उडवून..."

10 Jun 2023 16:49:43
up-hapur-anwar-arrested-for-offering-namaz-in-srichandi-temple

लखनऊ : उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये मंदिरात नमाज पठण करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अन्वर असे आरोपीचे नाव आहे. मंदिरात नमाज अदा करत असताना अन्वरने गझवा-ए-हिंदचा नारा दिला आणि मंदिर उडवून देण्याची आणि मशीद बांधण्याची धमकी दिली, असा आरोपा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ही घटना दि. ९ जून रोजी घडली.

 


हे प्रकरण हापूरमधील श्रीचंडी सिद्धपीठ मंदिराशी संबंधित आहे. मंदिरात पहाटे साडेचारच्या सुमारास एका तरुणाने मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर काही वेळाने त्यांने जमीनीवर चादर पसरवली आणि नमाज अदा करण्यास सुरुवात केली. यावर मंदिरातील पुजारी आणि उपस्थित लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. याचा राग येऊन त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. असभ्य वर्तन केल्यानंतरही तेथे उपस्थित असलेले लोक त्याला मंदिरातून निघून जाण्यास सांगत होते. त्यावर त्याने येत्या शुक्रवारी पुन्हा येऊन नमाज अदा करणे, अशी धमकी दिली.



इतकंच नाही तर मंदिर परिसरात गझवा-ए-हिंदचा नारा देत अन्वरने मंदिरात बॉम्बस्फोट करून तिथे मशीद बांधण्याची ही धमकी दिली आहे. यानंतर आपले इतर साथीदारही मंदिराबाहेर उपस्थित असल्याचे सांगून मंदिर लुटण्याची धमकी दिली. मात्र, त्यानंतर मंदिरातील पुजारी आणि भाविकांनी त्यांचा पाठलाग केला .मात्र अन्वरने पळ काढला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच मंदिराजवळ मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि एकच गोंधळ उडाला.



या घटनेमुळे संतप्त झालेल्या व्यापारी वर्गानेही बंदचा इशारा दिला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांसह डीएम, एसपी यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना शांत केले. पोलिसांनी मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अन्वरला अटक केली. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम २९५,२९५A ,२९८ ,कलम १५३Ah अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा कट नाही ,असे सांगितले आहे. तसेच आरोपींची कडक चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.

 
Powered By Sangraha 9.0