उषःकाल होता होता काळरात्र झाली ! - अतुल भातखळकर

10 Jun 2023 19:42:31

ajit pawar
मुंबई : दि.,१० जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता.या कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकारीणी अध्यक्षपदाची धुरा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवली.

या कार्यक्रमात उपस्थित अजित पवारांची देहबोली माध्यामांनी टिपली आहे. यात शरद पवारांच्या निर्णयावरुन अजित पवार हताश झालेले दिसून येतायत.शरद पवारांच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.त्यात भाजपच्या अतुल भातखळकर यांनी अजित पवारांचा व्हीडीओ चालवत सिंहासन चित्रपटाचे उषःकाल होता होता गाणे टि्वट केले आहे.













Powered By Sangraha 9.0