मोहम्मदने हिंदू बनून केले पीडितेचे शोषण! लग्नाचा बेबनावनंतर गर्भपात...

01 Jun 2023 18:16:08
muslim-mohammad-alim-arrested-for-exploiting-hindu-girl-student-in-bareilly

नवी दिल्ली
:उत्तर प्रदेशातील बरेलीमधून जिहादी मोहम्मद आलमला अटक करण्यात आली आहे. एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिचे संपुर्ण आयुष्य मोहम्मदने उद्धवस्त केले आहे. मोहम्मद हातात कलवा (रक्षा सूत्र ) बांधून त्या हिंदू युवतीला स्वता:चे नाव आंनद असल्याचे सांगत तिच्या आयुष्यात आला.त्यानंतर त्याने तिचे शोषण करत तिला ब्लॅकमेल केले. दरम्यान तिचा गर्भपात केला. त्यामुळे पोलीस आता मोहम्मदच्या घरच्यांना देखील ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत.

पीडीत तरुणी बरेलीतील देवरनिंया परिसरात राहत होती. पीडीतेने सांगितले की, ती कोचिंगला जात असताना एकदा तिची ओळख रूद्राक्ष आणि कलवा घालणाऱ्या आनंदशी झाली.दोघाचा परिचय वाढला. त्यानंतर एकदा आनंद उर्फ मोहम्मद आलमने त्या तरूणीला मंदिरात नेऊन विवाह केला. १३ मार्च २०१३ रोजी त्यांने हे विवाहाचे नाटक केले आणि त्यानंतर बरेलीमधील पीलीभीत बायपासजवळील वरील एका खोलीत घेऊन जाऊन त्या तरुणीचे शोषण केले. त्यावेळी त्या तरुणीचे आक्षेपार्ह फोटो ही त्यांने काढले आणि धमकी दिली.त्यानंतर तो तिला नियमित हॅाटेलवर घेऊन जाऊन बलात्कार करू लागला. त्यानंतर एकदा तो तिला आपल्या जौदपूर येथील घरी घेऊन गेला तेव्हा तो हिंदू नसल्याचे तरुणीच्या लक्षात आले.मग जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा त्यांने हाफिजगंज येथील हॅास्पिटल मध्ये घेऊन जाऊन गर्भपात केला.दरम्यान मोहम्मदला पीडीतेच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे.

 
Powered By Sangraha 9.0