केरला स्टोरी प्रपोगंडा चित्रपट म्हणणाऱ्या कमल हसनला मिळालं चोख प्रत्युत्तर!

    01-Jun-2023
Total Views | 2014

kamal hasan 
 
मुंबई : केरला स्टोरी चित्रपटावर टीका करणारे कमी नव्हेत. त्यांच्या टिकेला मात्र दिग्दर्शक सुदिप्तो सेन, अभिनेत्री अदा शर्मा आणि निर्माते विपुल शाह सडेतोड प्रतिउत्तरे देत आहेत. २०० कोटींचा टप्पा केवळ २ आठवड्यात पार करणाऱ्या चित्रपावर अजूनही टीका होतेय. नुकतीच दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनीही नकारात्मक सूर लावला. त्यावर विपुल शाह यांनी उत्तर दिले आहे.
 
कमल हसन म्हणाले, "मी तुम्हाला सांगितले होते हा प्रोपगंडा चित्रपट आहे आणि मी याच्या विरोधात आहे. केवळ चित्रपटाच्या लोगोवर किंवा पोस्टरच्या खाली सत्यघटनेवर आधारित असे लिहून उपयोग नाही. संबंधित घटना प्रत्यक्षात सुद्धा खरी असावी लागते,” असं कमल हासन ‘द केरला स्टोरी’बद्दल म्हणाले होते."
 
उत्तरादाखल विपुल सहा म्हणाले, "कमल हासन सर हे ज्येष्ठ अभिनेते आहेत, त्यांची कारकीर्द खूप मोठी आहे. ते माझे वरिष्ठ आहेत. त्यांच्या बोलण्यावर मी प्रतिक्रिया दिली तर त्यांचा अनादर होईल. पण, मी त्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी हा चित्रपट आधी बघावा. त्यानंतर त्यांनी मला फोन करावा किंवा मला भेटावं. आपण टेबलावर त्यावर बसून चर्चा करू. ते जे म्हणाले त्याला प्रतिसाद देण्याचा हा एक चांगला मार्ग असेल. त्यांना चित्रपटामुळे काही त्रास असेल, तर याबद्दल मला कोणतीही तक्रार नाही. पण, त्यांनी हा चित्रपट एकदा बघावा, मगच प्रतिक्रिया द्यावी."
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121