चित्रपटात मानधन घेण्याबद्दल कंगनाचं वक्तव्य... म्हणाली, "पुरुषा्ंप्रमाणे मीही ..."

    01-Jun-2023
Total Views |
kangna ranaut  
 
मुंबई : बॉलिवूड चित्रपट सृष्टीत स्त्री पुरुष यांच्यात भेदभाव केला जातो तसेच वागणूक आणि मानधनही सामान मिळत नाही, अशी ओरड अनेकदा ऐकू येते. याबाबत अभिनेत्री कंगना रानौत ने मोठे वक्तव्य केले आहे. यापूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने या प्रश्नांची उकल केली होती. गायक निक जोनास सोबत विवाह झाल्यानंतर जेव्हा ती पहिल्यांदा भारत दौरा करून गेली त्यावेळी तिने हे उद्गार काढले होते.त्यानंतर नुकताच हिट गेलेला चित्रपट म्हणजे द केरला स्टोरीची अभिनेत्री अदा शर्मा हिनेदेखील या मुद्द्याला घेऊन बॉलिवूड चित्रपट सृष्टीबाबत आपलं नकारात्मक मत मांडलं होतं.
 
त्याच मुद्द्याला घेऊन अभिनेत्री कंगना रानौत हिने प्रतिक्रिया दिली आहे. कंगना म्हणाली, "मी या इंडस्ट्रीत येण्यापूर्वी इतर अभिनेत्री पुरुषवादी विचारांच्या मर्यादेत राहून काम करत होत्या. अभिनेते आणि अभिनेत्री यांना सामान वेतन मिळत नव्हते. पण मी यासाठी संघर्ष केला. आज अभिनेत्याला जेवढी फी दिली जाते तेवढीच मलाही दिली जाते."
 
अदा शर्मा याबाबत म्हणाली होती, "बॉलिवूड इंडस्ट्रीची एक गोष्ट मला आवडत नाही. स्त्रीपुरुष समानतेचा मूड खरा लक्षात ग्यायला हवा. सामान वेतन बाजूला राहूदे पण इंडस्ट्री इतकी अभिनेत्यांभोवती फिरते कि जर अभिनेत्री असेल तर तिला सेट वर प्रथम बोलावून काहीवेळ उगाच बसवून ठेवलं जातं. सगळं ठीक आहेकी नाही पाहून मग अभिनेत्याला बोलावलं जातं. हे चुकीचं आहे."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.