बुलंदशहरात १०० वर्ष जून्या मंदिरावर हल्ला!

१२ मुर्त्यांची तोडफोड

    01-Jun-2023
Total Views |
bulandshahr-4-temples-attacked-12-deities-vandalised-resentment-of-villagers-heavy-police-force

नवी दिल्ली
: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील गुलावठी येथील बराल गावात समाजकंटकांनी ४ मंदिरातील १२ मूर्तीची तोडफोड केली आहे. त्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच आरोपींवर कारवाई करून मंदिरांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले.

त्यानंतर पोलीसांनी मंदिराला सील केले असून एडीएम आणि एसपी यांनी लवकरच समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. खबरदारी म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वातावरण बिघडवण्याच्या उद्देशाने अज्ञातांनी ही घटना घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

हे मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने आहे. ही घटना रात्री उशीरा घडली आहे. सकाळी जेव्हा भाविक प्रार्थना करण्यासाठी मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांना मूर्तीची मोडतोड झाल्याचे दिसले. हा प्रकार ४ मंदिरामध्ये घडला आहे. यातील एक मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने आहे. मूर्ती भंग झाल्याची बातमी परिसरात झपाट्याने पसरली.त्यानंतर ग्रामीण व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते व भाविक एकत्र आले आणि त्यांनी बरळ गावात पोहोचले. संतप्त हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळ गाठून मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करून समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. एसपी सिटी सुरेंद्र नाथ तिवारी यांनी सांगितले की, गुलावठीच्या बराल गावात चार वेगवेगळ्या मंदिरांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस लवकरच आरोपींना पकडतील.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.