इथे पहा दहावीचा निकाल! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रीया!

    01-Jun-2023
Total Views |
SSC Result Maharashtra

महाराष्ट्र
: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल २ जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाइन पध्दतीने हा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च या कालावधीत पार पडली होती. राज्यातून दहावीच्या परीक्षेला १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (२ जून ) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली.

खालील लिंकवर निकाल पाहता येणार

१. mahresult.nic.in
२. https://ssc.mahresults.org.in
३. http://sscresult.mkcl.org

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.