‘लव्ह जिहादी’चे कुटुंब!

01 Jun 2023 21:23:18
Love Jihad Aggrieved family

दिल्लीतील अल्पवयीन साक्षीच्या क्रूर हत्येने अख्खा देश हादरून गेला. दररोज कुणी ना कुणी विकृत ‘जिहाद’चा नंगानाच करत आपल्या लेकीबाळींचा जीव घेतोय. साक्षीच्या खूनाचा व्हिडिओ जितका संतापजनक आहे, तितकेच संतापजनक आहे ते तिचा खून होताना संथ, शांतपणे शतपावली करणार्‍या लोकांची वृत्ती! जीव सगळ्यांनाच प्रिय, पण साक्षीच्या जागी तिथे स्वत:ची मुलगी असती तर? ‘मला काय करायचे, माझे तर काही नाही ना?’ या वृत्तीचा फायदा विकृत जिहाद्यांनी अगदी इतिहास काळापासून घेतला आहे. त्यांना माहिती होते की, एकेका हिंदूला खिंडीत गाठून कापले, तर त्याच्या शेजारचा डोळे वर करूनही पाहणार नाही. ‘लव्ह’ नव्हे, तर विकृत ‘लस्ट जिहाद’चे परिपाक असलेल्या गुन्हेगाराविरोधात पुरावे मिळाले, तर कायद्याने सजा होते. पण, सजा केवळ त्यांना मिळता कामा नये. कारण, ‘लव्ह जिहाद’ची बळी गेलेली मुलगी एकटीच त्या नरकयातनेतून जात नाही, तर तिचे संपूर्ण कुटुंब बरबाद होते. तिच्या कुटुंबाला जो त्रास होतो, त्याला तर शब्दच नाहीत. त्या न्यायाने तिला बरबाद करणार्‍या आणि तिचा बळी घेणार्‍या नराधमाचे काय? त्याला एकट्यालाच सजा होणे हा निसर्ग न्याय नाही, तर त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबालाही त्याच्या कृत्याचा जाब विचारायलाच हवा. मूलं कशीही वागतात. ती पालकांना सांगून वागतात का? हा युक्तिवाद नकोच. कारण, हिंदू मुलींना फसवल्यावर आणि जीवही घेणे हे काही पाप नाही, ही असली विकृती यांच्यात कुठून येतेे? या सगळ्या गुन्हेगारांच्या पालकांची आणि समर्थकांची जी काही अगदी थातूरमातूर संपत्तीही जप्त करायला हवी. सार्वजनिक जीवनातून त्यांना बहिष्कृत करायला हवे. त्यामुळे ‘काफीर की बेटी’ला कापले, तोडले, गुलाम बनवले, तर जन्नत मिळेल अशी विकृत मानसिकता असलेल्यांना भीती राहील की, ‘काफीर की बेटी’ला काही केले, तर आपल्या कुटुंबाचेही काही खरे नाही. तसेच, आपला मुलगा हिंदूच्या मुलीला जाळ्यात ओढतोय हे पाहून सुखावणारे काही विकृत पालकही आहेतच. असे पालक वेळीच त्यांच्या त्या विकृतीला आणि विकृत लेकाला आवरतील. उत्तर प्रदेशामध्ये हिंस्र गुडांच्या घरावर जसे बुलडोझर चालवले जाते, तसेच आणि विस्ताराने या ‘लव्ह जिहाद’, ‘लस्ट जिहाद’ करणार्‍यांच्याबाबत व्हायला हवे. तुमचे काय मत आहे?

गौतमी आणि प्रश्नच प्रश्न!

कोणी कोणते आणि कसे कपडे परिधान करावे की करू नये, याचे जितके स्वातंत्र्य उर्फी जावेदला आहे, तितकेच स्वातंत्र्य गौतमी पाटीललाही आहे. तिने अश्लील हावभाव करावे की मंचावर आणखी काही करावं, अर्थात ‘श्लील’ आणि ‘अश्लील’तेच्या व्याख्या दृष्टिसाक्षेप आहेत. असो. इथपर्यंत येण्यासाठी गौतमीने नक्कीच संघर्ष केला असेल आणि तो शब्दातीतच असणार. सध्या गौतमीच्या ‘पाटील’ आडनावावरून बरेच वादळ उठले आहे. तिने ‘पाटील’ नावच लावावे, असे वाटणारे संभाजी भगत असू दे की सुषमा अंधारे, त्यांनी गौतमीबद्दल मत मांडले. त्यांना वाटते की, पाटील नाव समाजात उच्चवर्णीयांचे असते आणि त्यांचे आडनाव घेऊन मुलगी नाचते म्हणून हे लोक गौतमीला पाटील नाव लावू नको, म्हणून सांगत आहेत. काहींनी तर आनंदाने म्हटलेही की, कालपर्यंत ज्यांनी दुसर्‍यांच्या मुली नाचवल्या, त्यांचेच आडनाव लावत आज एक मुलगी नाचते, असे म्हणणारे लोकही खरे विकृत! हपापलेल्या आणि आता खाऊ की गिळू, अशा विकृत मानसिकतेच्या लोकांसमोर कुणाचीही लेक नाचते, हे दृश्य दुःखदायकच. आता यावर हे लोक माधुरी दीक्षित, माधुरी पवारचे उदारहण देतात. दीक्षित असो पवार असो की चाबुकस्वार, कुणाचीही लेक नाचताना तिच्या कलेला न पाहता तिला ‘सावज’ म्हणून पाहणारे जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात आहेत. गौतमीने महाराष्ट्राचा बिहार केला, अशीही चर्चा आहे. पण, गौतमीला नाचवणारे बिहारमधले नाहीत, तर महाराष्ट्रातलेच आहेत, हेसुद्धा सत्यच! त्यामुळे गौतमीने महाराष्ट्राचा बिहार केला का, म्हणताना तिच्यावर पैसे उधळणार्‍या युवकांची संस्कृती कोणती? यावरही विचार करणे गरजेचे आहे. तिच्यावर पैसे उधळणारे केवळ पाटीलच असतात का? नाही तर तिथे सर्वजातीय पुरुष दिसतात. मात्र, ‘राती अर्ध्या राती असं सोडून जायाच न्हाय’ या गाण्यावर अश्लील हातवारे, अविर्भाव करत कुणी उघड्या स्टेजवर पूर्ण कपडे घालून जरी उत्तान हावभाव करत असेल, तर ते तसे करणारी आमची लेक आहे बरं का? तिने आमचं नाव उज्ज्वल केले बरं का, असं कुणी जोशीही म्हणणार नाही, पाटीलही म्हणणार नाही आणि कांबळेही म्हणणार नाही, हे मात्र खरे. दुसरीकडे घसघशीत बिदागी घेऊन, स्थिरस्थावर झाल्यावरही ‘मी पोटासाठी नाचते,’ असे जेव्हा गौतमी म्हणते, तेव्हा, तिचे म्हणणे खरे मानायचे का?

Powered By Sangraha 9.0