आयटीआय म्युच्यूअल फंडातर्फे आयटीआय फोकस्ड इक्विटी फंडचा शुभारंभ

    01-Jun-2023
Total Views |
 
मुंबई: आयटीआय़ म्युच्युअल फंडाने एप्रिल 2019 मध्ये आपल्या कामकाजाचा शुभारंभ केला असून गुंतवणूकदारांसाठी मुख्य प्रवाहातील 17  म्युच्युअल फंड बाजारात आणलेले आहेत. मालमत्ता व्यवस्थापन कंपनीला (एएमसी) रोखतेच्या बाबतीत समृद्ध असलेल्या पारंपारिक उद्योग समूहाचे पाठबळ लाभलेले आहे.

गुंतवणुकदारांसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक सहजसुंदर अनुभव मिळण्यासाठी अंत्यत कमी कालावधीत, या एएमसीमध्ये प्रशासन, ग्राहक, प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा या घटकांच्या उभारणीवर उद्योगसमुहाने भर दिलेला आहे.  आयटीआय 22 मे 2023 अखेरीस चार हजार 11 कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन हाताळत आहे. एकूण व्यवस्थापित निधीपैकी 3,285 कोटी रुपये विविध समभागांत तर हायब्रीड आणि डेट योजनांत अनुक्रमे 432 कोटी आणि 295 कोटी  रुपये गुंतवलेले आहेत.

या एकूण निधीचे भौगोलिक वितरण अतिशय विविधांगी असून देशातील टॉप पाच शहरातून 46.10 टक्के, त्यानंतरच्या दहा शहरातून 21.99 टक्के, त्यापुढील वीस शहरातून 15.01 टक्के, तर या शहरानंतरच्या 75 शहरात 12.68 टक्के आणि राहिलेल्या बाकी शहरांचा हिस्सा 4.22 टक्के आहे. 
आयटीआय म्युच्युअल फंडाने आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड हा एनएफओ गुंतवणूकदारांसाठी आणत असल्याची घोषणा केली आहे आणि हा एनएफओ गुंतणकीसाठी आज उघडेल आणि येत्या 12 जून 2023 रोजी बंद होणार आहे.

आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड हा प्रामुख्याने 30 कंपन्यांच्या भांडवली बाजारमूल्यात गुंतवणूक करणारा अत्यंत केंद्रित असा पोर्टफोलिओ असणार आहे. या फंडात किमान पाच हजार रुपये आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. या फंडाचे व्यवस्थापन श्री. धीमंत शहा आणि श्री. रोहन कोरडे हे संयुक्तरित्या सांभाळणार आहेत. आयटीआय फोकस्ड इक्विटी फंडासाठी निफ्टी 500 टोटल रिटर्न हा पायाभूत निर्देशांक राहणार आहे.

विविध भांडवली बाजारमूल्य असलेल्या तीस कंपन्याच्या समभाग आणि समभागांशी संबंधित तत्सम साधनांमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहे. दीर्घकाळ गुंतवणूकीचा दृष्टीकोन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा एनएफओ सुयोग्य आहे. एनएफओच्या शभारंभाची घोषणा करताना आटीआय म्युच्यूअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राजेश भाटिया म्हणाले, “आमच्या गुंतवणूकदाराच्या जोखीम क्षमतेनुरूप बाजारात नवनवीन गुंतवणूक साधने आणणे हे एक फंड घराणे म्हणून आमचा सतत प्रयत्न राहिलेला आहे.

आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड हा प्रामुख्याने केंद्रीत पोर्टफोलिओ असून आमच्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत विविध क्षेत्रातील वाढीचे घटक आणि वाढीचे शिलेदार यांचे फायदे मिळवून देण्याची आमची मनिषा आहे. उत्तम कामगिरीची परंपरा आणि गुंतवणूकीच्या भरभक्कम तत्वज्ञानाच्या आधारावर चालणाऱ्या आयटीआय म्युच्यूअल फंडाने विविध प्रकारच्या जोखीमक्षमता असलेल्या सर्व गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीचे पर्याय देण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे”. चार वर्षांच्या कालावधीत, आयटीआय म्युच्युअल फंडाने 17 योजना सुरू केल्या आहेत आणि गुंतवणूकदारांना सर्वोत्तम गुंतवणुक अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे. आयटीआय म्युच्युअल फंडाचे देशात 57 हून अधिक ठिकाणी (त्यांच्या शाखा/आयटीआय समूह कार्यालयांसह) केंद्र आहेत  आणि भारतभर 21 हजार 209 वितरकांचे जाळे कार्यरत आहे.

WhatsApp Image 2023-06-01 at 12.09.36.jpg
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.