सिंधी समाजाची बदनामी केल्यावर काय म्हणाले आव्हाड?

01 Jun 2023 18:50:07
 
Jitendra Awhad
 
 
ठाणे : मी भाषण केलं भाषणात मी बोललो की, 'सौ जंगली कुत्ते मिलके, एक शेर का शिकार नही कर सकते' आणि तो व्हिडिओ एडिट करून मॉर्फ करून हा व्हिडिओ चालवण्यात आला असून सगळीकडे पसरवण्यात आला आहे. माझ्या बद्दल सिंधी समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. मला माहित नाही हे कोणी केलं. पण ज्यांनी माझ्याबरोबर गुन्हा दाखल केला, त्यांनी हा व्हिडिओ आणला कुठून पोलीस कधीच चौकशी करणार नाही का? सत्याची परीक्षा घेणार की नाही? की आम्ही तपास तो व्हिडिओ तिथे टायपिंग करणारे हजारो लोक पत्रकार उपस्थित होते. त्यांनी पहिल्या दिवशी तो व्हिडिओ चालवला नसता का?
 
जर मी असं काही वेडवाकडे बोललो असतो, तर त्यांनी पहिल्या दिवशी तो व्हिडिओ चालवला असता. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघतो आणि अख्या गावभर प्रसारित होतो आणि पोलीस चौकशी करत नाही डायरेक्ट केस दाखल करून टाकतात. मी फक्त पप्पू कलानी यांच्या घरात जातो आणि पप्पू कलानीच्या आशीर्वादाने आम्ही पुढची उल्हासनगर महापालिका जिंकणार आहोत आमचा तिथे महापौर बसणार आहे. उल्हासनगरची सीट देखील राष्ट्रवादी जिंकणार आहे. एवढे स्पष्ट बोलतोय मी पण ही काय पद्धत आहे. ठाण्यामध्ये म्हणजे पोलिसांनी तपासाच करायचा नाही. वरून फोन आला की, टाक केस फोन आला की टाक केस आणि मी तर यांचा गिर्‍हाईकच झालोय.. जितेंद्र आवडला त्रास द्या.. अहो त्रास देऊन राजकारणात काही होत नाही.
 
काल मीटिंग घेऊन आले लांडगे साहेब. शिवसेनेचे जय शिंदे साहेबांचे लाडके लांडगे साहेब आहेत ना ते उल्हासनगर मध्ये मोठी मीटिंग घेऊन आले. काल ठाण्यामध्ये मीटिंग घेतली की जितेंद्र आवाडे यांच्या विरोधात असे बोलू. लांडगे साहेब माझे चांगले मित्र आहेत. मला माहितीये त्यांचा स्वभावाचा नाहीये पण त्यांनी हे कोणाच्या दबावाखाली केले हे मला चांगलं माहिती आहे. ज्या बचकंडामध्ये प्रगल्भताच नाही त्याच्या नादाला कुठे लागतं लांडगे साहेब.आता ओरिजनल व्हिडिओ समोर आलंय आता काय करणार. माफी मागणार माझी. तुम्ही माफी मागावी अशी माझी इच्छा पण नाही.. पण जे दुसऱ्या पक्षाचे नेते लगेच उद्या मारत उल्हासनगरला गेले जणू काही जितेंद्र आव्हाड सापडला पण काय झालं नागडे झालात.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0