मुलुंड, मुंबई येथे साऊथ इंडियन बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन !

बँकेच्या कामकाजाचा विस्तार करणे आणि या क्षेत्रातील मोठ्या ग्राहकांना आकर्षित करणे आणि प्रगत बँकिंग सेवा प्रदान करण्याच्या धोरणाच्या अनुषंगाने या नवीन शाखेची सुरुवात करण्यात आली आहे.

    01-Jun-2023
Total Views |

south indian

मुंबई : 'साऊथ इंडियन बँके'ने आपली व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने आणि या क्षेत्रातील बँकिंग सेवेची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने,आज मुंबईतील मुलुंड येथे आपल्या नवीन शाखेचे उद्घाटन केले आहे.बँकेच्या कामकाजाचा विस्तार करणे आणि या क्षेत्रातील मोठ्या ग्राहकांना आकर्षित करणे आणि प्रगत बँकिंग सेवा प्रदान करण्याच्या धोरणाच्या अनुषंगाने या नवीन शाखेची सुरुवात करण्यात आली आहे.

नवीन शाखेत 'एटीएम' असून मुंबईच्या उत्तर उपनगरात राहणाऱ्या व्यापारी आणि नोकरदार वर्गाच्या आर्थिक आणि बँकिंग गरजा पूर्ण होतील. मुलुंड हे निवासी, किरकोळ, व्यापारी आणि औद्योगिक संकुलांचे उत्तम मिश्रण असल्यामुळे येथे 'साऊथ इंडियन बँके' स्वतंत्र शाखा कार्यालय स्थापन करण्याची गरज आहे.हे ओळखून येथे ही नवी शाखा सुरू करण्यात आली आहे. 'साऊथ इंडियन बँकेचे' व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी 'मुरली रामकृष्णन' आणि 'मॅरेथॉन ग्रुप'चे संचालक 'कैवल्य शहा' यांच्या हस्ते नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना 'साऊथ इंडियन बँके'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी 'मुरली रामकृष्णन' म्हणाले, "आम्ही आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.मुलुंड शाखा मंगळवार, दि .३० मे पासून नियमित बँकिंग वेळेनुसार दुकान क्रमांक: १९,२०,२१ तळ मजला, मॅरेथॉन, मोंटे प्लाझा, एमएमएम रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई - ४०००८० येथे कार्यान्वयीत होईल.


तसेच ग्राहकांचा सुलभ अनुभव मिळावा यासाठी 'साऊथ इंडियन बँके'ची वांद्रे शाखा तळमजला, चित्रापूर सीएचएसएल, डी/१, २७ वी रोड, वांद्रे पश्चिम, मुंबई - ४०५० येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा तसेच ग्राहकांना मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लॉकरची सेवा प्रदान करण्यात आली आहे.



'साऊथ इंडियन बँक' ही केरळमधील खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. बँकचे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (एनएसई) येथे सूचीबद्ध आहे.'साऊथ इंडियन बँके'च्या भारतात ९४० शाखा, '११६७ एटीएम' आणि '१२३ सीडीआर/सीडीएम' असून दुबई, युएई येथेही त्यांच्या शाखा आहेत. 'साऊथ इंडियन बँक' तंत्रज्ञान-आधारित बँकिंगमध्ये अग्रगण्य आहे, जी विविध डिजिटल उत्पादने आणि सेवा आपल्या ग्राहकांना प्रदान करते. बँकेचे व्हिजन २०२४ भांडवल, सीएएसए, कॉस्ट टू इनकम, कॉम्पिटेन्सी बिल्डिंग, कस्टमर फोकस आणि कंप्लायंस या '६ सीवर' केंद्रित आहे.







 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.