मुंबई : द केरळ स्टोरी चित्रपटाची चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरु आहे. न्यायालयाने चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे सांगूनही अनेक मुस्लिम संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत. अशातच AIMIM च्या असदुद्दीन औवेसी यांनी चित्रपटाविषयी नकारात्मक टिप्पणी केली आहे. देशात मुस्लिमांनाबदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी चित्रपटाविरोधात केला आहे.
ओवेसी पुढे म्हणतात, "देशात मुस्लिमांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. जे १३० करोड लोकांचे पंतप्रधान आहेत. ही ढळढळीत खोटी माहिती आहे, मी चित्रपट निर्मात्यांना पुन्हा विचारतो की ही माहिती कितपत खरी आहे? मुसलमानांना बदनाम करून अजून किती दिवस तुम्ही स्वतःचे पोट भरणार आहेत?"
सादर वक्तव्य असदुद्दीन औवेसी यांनी संभाजीनगर येथे बोलताना केले. यावेळी त्यांनी केवळ नरेंद्र मोदी आणि चित्रपटाच्या चमूवर ताशेरे ओरडले नाहीत तर इसिस च्या कृत्याचे समर्थन करून इसिसला असलेला आपला छुपा पाठिंबा उघड केला आहे. समाजात होत असणारी काली कृत्ये लपवायला हवी असे म्हणताना त्यामागचा ओवेसी यांचा खरा चेहरा समोर येत आहे.