मी 'द केरला स्टोरी' सारखे चित्रपट कधीच बघत नाही : प्रकाश आंबेडकर

09 May 2023 17:07:32
 
Prakash Ambedkar
 
 
मुंबई : मी 'द केरला स्टोरी' सारखे चित्रपट कधीच बघत नाही. या चित्रपटातुन घेण्यासारखे काहीच नाही. असं वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. शिवाय या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी राजकीय वाद निर्माण केला जात आहे. अशीही टीका त्यांनी केली.
 
आंबेडकर म्हणाले, "मी द केरला स्टोरी सारखे चित्रपट कधीच बघत नाही. या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी राजकीय वाद निर्माण केला जात आहे. त्यासाठी हे राजकारण सुरू असून या चित्रपटातून घेण्यासारखे काही नसेल अशी प्रतिक्रीया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. काही जण ठरवून लग्न करतात, तर काही जण प्रेमविवाह करतात. प्रेमविवाह करताना जात धर्म बघितला जात नाही."
 
 
 
Powered By Sangraha 9.0