बुरखा घातला नाही, तर अल्लाह जहन्नुमच्या आगीत ढकलेल!

08 May 2023 16:37:11
thrissur-anagha-converted-by-muslim-friend-says-the-kerala-story-real

नवी दिल्ली : 'द केरला स्टोरी' चित्रपटामुळे इस्लामिक धर्मांतराचे षड्यंत्र प्रकाशझोतात आले. अनेक पीडिता स्वत: पुढे येऊन त्यांच्या कहाण्या सांगत आहेत. त्यापैकी एक अनघा ही केरळच्या त्रिशूरची रहिवासी आहे. अनघाने ही तिचा ब्रेनवॉश तिच्या मुस्लिम मित्रांनी केले असल्याचे सांगितलय. तसेच अनघाने ही आपले इस्लामिक धर्मांतर 'द केरला स्टोरी' चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच झाले असल्याचे सांगितले.

अनघा म्हणते की, माझा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला. माझ्या कुटुंबात माझ्या आई-वडिलांशिवाय मला दोन बहिणी आहेत. मी एक फिजिओथेरपिस्ट आहे आणि आर्शा विद्या समाजाची पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. ५ मे रोजी मी The Kerala Story हा चित्रपट पाहिला. तो चित्रपट पाहून मला वाटले की पडद्यावर दाखवलेली कथा ही माझ्या आयुष्याशी मिळती जुळती आहे. २०२० मध्ये आर्शा विद्या समाजामध्ये येण्याआधी इस्लामचे पालन करत होती.

अनघा सांगते की, पुर्वी मी माझा धर्म , खरा इतिहास आणि देशातल्या चालू घडामोडी याकडे दुर्लक्ष करून इस्लामला अधिक महत्त्व देत होते. त्यानंतर मी इस्लामबद्दल वाचायला सुरूवात केली. माझ्या कॉलेजच्या दिवसात मी एर्नाकुलमच्या हॉस्टेलमध्ये होते. तिथे माझी मुस्लिम रूममेट मला माझ्या धर्माबद्दल विचारायची. तिचे प्रश्न माझ्या धर्माबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असायचे. त्यावेळी मला तिच्या प्रश्नांची उत्तर देता आली नाही. मला माझ्या धर्माबद्दल योग्य मार्गदर्शन मिळाले नाही म्हणून मी गप्प राहिले, अस अनघा सांगते.

पुढे अनघा म्हणते, त्यानंतर मी माझ्या पालकांशी या प्रश्नांवर चर्चा केली. पण त्याच्याकडून ही मला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानंतर मी सोशल मीडियावर माझ्या प्रश्नाची उत्तर शोधू लागले. पण तेथेही मला काही समाधानकारक आढळले नाही. मग मला हिंदू धर्माच्या वैधतेबद्दल शंका येऊ लागली. दुसरीकडे, जेव्हा मी माझ्या मुस्लिम रूममेटला इस्लामबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तिने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, कारण तिला लहानपणापासून इस्लामबद्दल शिकवले गेले होते. त्यावेळी त्या मुस्लिम मुलीने हिंदू धर्मावरही टीका केली पण तिला प्रत्युत्तर द्याला माझ्याकडे उत्तर नव्हते.
 
दरम्यान त्यांनी मला सांगितले की अल्लाह हा एकमेव देव आहे. त्यानंतर त्या मुस्लिम मुलींचा आणि इस्लामचा प्रभाव माझ्यावर पडू लागला. त्यामुळे मी त्यांच्याकडून इस्लामबद्दल जाणून घेऊ लागले. तसेच त्या मुस्लिम रूममेंटनी मला इस्लामिक अभ्यासादरम्यान झाकीर नाईक, एमएम अकबर आणि काही लोकांचे व्हिडिओही दाखवले. संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालण्याची सूचना त्यांनी मला केली. आणि काही दिवसांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर अनघाचे नाव आयमा अमीरा ठेवण्यात आले, असे ही अनघा सांगते. एकंदरित 'द केरला स्टोरी'सारखेच इस्लामच्या नावावर ब्रेनवॉश झाल्याचे अनघा सांगते.


Powered By Sangraha 9.0