सुवर्ण मंदिरानजीक दोन दिवसांत दुसरा स्फोट, पोलीस म्हणतात फक्त अपघात

08 May 2023 15:38:47
explosion-again-near-amritsars-golden-temple

चंडीगढ : अमृतसरच्या जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटवर दि. ८ मे रोजी पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे संपुर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. बॉम्बस्फोटाची घटना घडताच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यापूर्वीही दि. ६ मे रोजी रात्री बॉम्बस्फोट झाला होता. आता बॉम्बस्फोट झालेल्या घटनेच्या २०० मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला होता.स्फोटात आयईडीचा वापर झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात एक जण जखमी आहे.

मात्र पंजाब पोलीसांनी ही घटना दहशतवादी घटना नसून अपघात असल्याचे म्हटणे आहे. मात्र, नेमक्या एका दिवसानंतर त्याच ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याने हा मोठा कट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय पोलीसांनी या परिसरातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र बॉम्बस्फोटाची चौकशी सुरू आहे.


 
Powered By Sangraha 9.0