राज ठाकरेंचा मिमिक्री करणं जन्मसिद्ध हक्क : अजित पवार

07 May 2023 16:38:04
ajit-pawar-reaction-on-raj-thackeray-mimicry

पुणे
: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांची मिमिक्री केली. तसेच अजित पवारांच्या वागण्यामुळे शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला , अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत केली होती. त्या राज ठाकरेंच्या विधानाला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले की, राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसर काहीही जमत नाही.मिमिक्री करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळेच जनतेने त्यांना नाकारल आहे,असा खोचक सवाल करत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या मिमिक्रीची खिल्ली उडवली.

काही लोकं सोडली तर सर्व लोकं दूर गेली आहेत. पक्ष वाढवण्यापेक्षा माझी मिमिक्री करण्यात आणि माझे व्यंगचित्र काढण्यात समाधान मिळते त्यामुळे यातून ते समाधानी होत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.
 
 
Powered By Sangraha 9.0