मुंबई : सुप्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या छावा, मृत्युंजय आणि युगंधर या तीन पुस्तकांवर घातलेली बंदी ३ मे रोजी उठवण्यात आली. सादर माहिती जिल्हा सत्र न्यायालयाकडून प्राप्त प्राप्त झाली आहे. या पुस्तकांसोबतच शिवाजी सावंत लिखित इतर सर्व पुस्तके मेहता पब्लिशिंग हाऊस मार्फत उपलब्ध होणार आहेत.
तरीही ही पुस्तके इतर प्रकाशकांकडून विकत घेऊ नये असे आवाहन मेहता पब्लिशिंग हाऊसने केले आहे. कॉंटिनेंटल आणि मिहाना प्रकाशनाकडून ही पुस्तके खरेदी केल्यास मात्र कायदेशीर गुन्हा ठरेल. असे मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी आपल्या सोशल अकाउंट्स वरून जाही केले.