नवी दिल्ली : क्रिकेटमधील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकताच ५० वा वाढदिवस साजरा केला. मात्र आता क्रिकेटच्या देवाने सचिन खऱ्या आयुष्यात गरीब मुलांसाठी देव ठरला आहे. २०१३ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक कामे केली. सध्या सचिन तेंडुलकर फाऊंडेशन मध्य प्रदेशातील संदलपूर गावात शाळा बांधणार आहे.
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील खाटेगाव तालुक्यातील या गावात सचिन तेंडुलकर फाऊंडेशन पोहोचले आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार या गावाचा साक्षरता दर कमी आहे आणि तो सतत वाढत आहे.त्यामुळेच सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने तेथे शाळा बांधून पुढील दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ येथील सुमारे २३०० मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकर फाउंडेशनने ही शाळा सचिनचे आई -वडील रजनी तेंडुलकर आणि रमेश तेंडुलकर यांना समर्पित केली आहे.