उज्जैनच्या महाकाल मंदिरात सारा अली खानचे देवदर्शन

सारा अली खान

    31-May-2023
Total Views |
 
sara ali khan
 
मुंबई : आपला चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी प्रमोशनच्या निमित्ताने देवदर्शन करण्याचे नवीन फॅड आले आहे. नुकतेच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेत्री सारा अली खान हिने उज्जैनच्या महाकाल मंदिरात देवदर्शन केले. सारा अली खान मंदिरात देवाला हातही जोडते आणि दर्ग्यात सुद्धा जाते.
 
'जरा हटके जरा बचके' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सारा अली खान व्यस्त आहे. दि. ३१ मे रोजी सारा देवदर्शनाला गेली होती. यावेळी ती भस्म आरतीतही सहभागी झाली होती. या चित्रपटात सहकलाकार म्हणून अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. यापूर्वी विकी आणि सारा लखनौला सेतू मारुती मंदिरातही दर्शनाला गेले होते. परंतु काही थानिकांनी सरळ मंदिरात प्रवेश देण्याबाबत निषेध नोंदवला.
 
अभिनेत्री सारा अली खानने महाकाल दर्शनादरम्यान मीडियाशी कोणतीही चर्चा केली नाही, परंतु ती पंडित संजय पुजारी यांना 11:30 च्या फ्लाइटची काळजी नसल्याचे सांगताना दिसली. मला भस्म आरती तसेच मंदिरात सकाळी 7.00 वाजता होणारी आरती आणि सकाळी 10.30 वाजता होणाऱ्या आरतीमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. अभिनेत्री सारा अली खान हिने भस्मआरती आणि संध्याकाळी ७ वाजताच्या आरतीला हजेरी लावली, पण संध्याकाळी ७.३० वाजता इंदूरला रवाना झाली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.