हेच का तुमचं मोहब्बत की दुकान? राहुल गांधींच्या कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अपमान!

31 May 2023 15:05:27
national-anthem-was-playing-in-rahul-gandhi-program-claim-people-did-not-stand-up-video-viral

नवी दिल्ली
: राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे भारतीयांना संबोधित करण्याचा काम ते करत आहेत. त्यावेळी दि. ३१ मे रोजी कैलिफोर्निया येथे खलिस्तानी झेंडे फडकवले गेले. दरम्यान राहुल गांधीच्या एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात भारताचे राष्ट्रगीत सुरू असते पंरतू तिथे उपस्थित असलेले कोणीही राष्ट्रगीतसाठी उभे राहत नाही.

त्या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, काही मुले स्टेजवर राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. मात्र त्यांच्यासमोर बसलेले काही लोक खुर्चीवर आरामात बसलेले आहेत. तर काही लोक इकडून तिकडून फेऱ्या मारताना या व्हिडीओत दिसत आहे. अर्ध्याहून अधिक राष्ट्रगीत संपून ही तेथील लोक राष्ट्रगीताला उभे राहत नाहीत.त्यामुळे 'मोहब्बत की दुकान' आहे अस म्हणाऱ्या राहुल गांधीच्या कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अपमान होताना दिसत आहे.



 
Powered By Sangraha 9.0