नेपाळचे पंतप्रधान प्रचंड चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर!

31 May 2023 11:59:21
 
Pushpa Kamal Dahal
 
 
मुंबई : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड) हे बुधवार ३१ मे पासुन चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. ते विविध मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. ३१ मे ते ३ जून या कोलोवधीत ते विविध नेत्यांच्या भेटी घेऊन चर्चा करणार आहेत. या भेटीदरम्यान प्रचंड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीदेखील भेट घेणार आहेत.
 
नरेंद्र मोदींनी दिलेल्या आमंत्रणानंतर प्रचंड भारत दौऱ्यावर येत आहेत. ६८ वर्षीय प्रचंड यांच्यासोबत त्यांच्या कन्या मुलगी गंगा दहल यादेखील भारतात येणार आहेत. १ जून रोजी प्रचंड मोदींसोबत प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत. त्यानंतर दोन्ही देशांचे पंतप्रधान संयुक्त पत्रकार परिषद घेतील. ३ जून रोजी काठमांडू जाण्याआधी प्रचंड मध्य प्रदेशच्या उज्जैन आणि इंदौर शहराचा दौरा करणार आहेत. प्रचंड हे भारत दौऱ्यावर येणारे नेपाळचे चौथे पंतप्रधान आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0