सिंधुदुर्गवासीयांसाठी मोठी बातमी! वंदे भारत एक्सप्रेस कणकवलीत थांबणार

31 May 2023 15:29:00
Nitesh Rane Kankavali Vande Bharat Express

मुंबई
: आमदार नितेश राणे यांच्या मागणीला यश मिळाले आहे. कोकणात धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला कणकवलीत थांबा मिळणार आहे. नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे वंदे भारत आता कणकवली स्थानकातही थांबणार आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसने जाणाऱ्या सिंधुदुर्गवासीयांना याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे, सिंधुदुर्गवासीयांना ही एक अनोखी भेट असणार आहे. कणकवलीत थांबणार असल्याकारणाने सिंधुदुर्गवासीयांना वंदे भारतला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आमदार नितेश राणे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. आता त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे.

दरम्यान, आ. नितेश राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे वंदे भारत आता कणकवली स्थानकातही थांबणार आहे. मुंबई ते गोवा या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला कोकणवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. वंदे भारतमुळे प्रवास कमी वेळेत होणार असल्यामुळे याला चाकरमान्यांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 

Powered By Sangraha 9.0