गोरखपूरला फिल्मसिटी बनवण्याचे स्वप्न : रवी किशन

31 May 2023 16:52:20
Gorakhpur Film City Ravi Kishan

मुंबई
: उत्तर प्रदेशातील गोरखपूरला फिल्मसिटी बनविण्याचे आपले स्वप्न असल्याचे खासदार अभिनेता रवी किशन यांनी म्हटले आहे. गोरखपूर येथे फिल्मसिटी उभारण्याची आपली इच्छा असल्याचेही ते म्हणाले. गोरखपूरच्या १५० एकर जागेवर सध्या काम सुरू असल्याचे समजते आहे. तेथे फिल्मसिटी निर्माण केली जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गोरखपूर येथील १५० एकरवर सुरु असलेले काम हे चित्रनगरी उभारण्यासाठी एका योजनेवर काम सुरु असून ही एक प्रादेशिक फिल्मसिटी असेल, असेही रवी किशन म्हणाले. मनिष तिवारी दिग्दर्शित 'चिडियाखाना' या २ जूनला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात अभिनेता रवी किशन झळकणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासाठी मुंबई दौरा करून बॉलिवूड कलाकारांची भेट घेतली होती. त्यावेळीच मुख्यमंत्री योगींनी फिल्मसिटीबाबत सुतोवाच केले होते. त्यामुळे आता फिल्मसिटीसंदर्भात उत्तर प्रदेशात वेगवान हालचाली सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Powered By Sangraha 9.0