साहिल अन् कट्टरपंथींच्या झुंडीमुळे साक्षीसाठी कुणी पुढं आलचं नाही!

30 May 2023 16:40:43
sahil-was-with-his-gang-cctv-video-sakshi-hindu-girl-killed-in-delhi-shahbad-dairy

नवी दिल्ली : दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात दि.२९ मे रोजी एका अल्पवयीन मुलीची साहिल उर्फ मोहम्मद सरफराज यांने सूरा भोसकूनव हत्या केली. आरोपी मोहम्मद सरफराजला पोलीसांनी अटक केली असून या हत्याकांडात ६ आणखून संशयितांचा शोध पोलीसांकडून सुरू आहे.त्यातच एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून कळत आहे की, साहिल हा शाहबाद परिसरात एका मुलाशी बोलत होता. तसेच दोघेही फोनवर काहीतरी पाहत होते.

त्यामुळे पोलीसांच्या चौकशीत आता साहिलच्या मैत्राचा ही समावेश करण्यात आला आहे. खुन होण्यापुर्वी साहिल आणि त्याचा मित्र आकाश दोघेही घटनास्थळी बोलताना दिसत आहेत. साहिल त्यावेळी साक्षीची वाट पाहत होता. याबाबत आकाशकडे काय माहिती होती, हे पोलीस तपासात कळेलचं.
 
दुसरीकडे साहिल साक्षीवर चाकूने वार करत असताना प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मुलीला चाकूने मारताना साहिल टोळीने तिथे होता. या टोळीच्या भीतीने तेथून जाणारे लोक काहीच करत नसल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. तसेच प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्याने साहिलला अनेकदा पाहिले होते आणि खुनाच्या दिवशी त्याची टोळी घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर होती. टोळीतील मुलांसोबत तो ड्रग्जही करायचा.
 
दरम्यान साहिलचे अनेक मुलीशी मैत्रिचे संबध असल्याचे ही त्यांच्या इंस्टाग्राम मुळे कळले आहे. त्यामुळे साहिल आणि साक्षीच्या भांडणाचे हे प्रमुख कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Powered By Sangraha 9.0