शाहबादची जिहादी मानसिकता; पीडितेच्या डोक्याचे चार तुकडे, शरीरावर १६ घाव!

30 May 2023 15:12:40
post-mortem-report-of-sakshi-skull-was-cracked-16-wounds-on-body-sahil-killed-minor-hindu-girl

नवी दिल्ली
: दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका १६ वर्षीय मुलीचा चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध त्याच्यावर वार करण्यात आले. चाकूचा अवलंब करून आतडे बाहेर काढणाऱ्या मारेकरी साहिलला दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक केली. त्यानंतर साक्षीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट उघड झाला आहे.

या रिपोर्टमध्ये साक्षीच्या शरीरावर १६ मोठ्या जखमा आढळल्या आहेत. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार जड वस्तूच्या आघातामुळे मृताची कवटी फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. साक्षीच्या मानेवर ६ तर पोटावर १० मोठ्या जखमा आहेत. या माहितीनंतर हादरलेल्या साक्षीच्या कुटूंबीयांनी नराधमाने माझ्या मुलीच्या डोक्याचे चार तुकडे केले असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. दरम्यान साहिल सरफराज उर्फ मोहम्मद सरफराज हा अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे ही उघड झाले आहे.

 

 
Powered By Sangraha 9.0