आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधीत्त्व

30 May 2023 22:11:16
World Otters Day Omkar Patil




 मुंबई : इंटरनॅश्नल ऑटर सर्व्हायवल फंड म्हणजेच आयओएसएफ या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत दरवर्षी जागतिक पाणमांजर दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या ३१ मे रोजी येणाऱ्या जागतिक पाणमांजर दिनाच्या औचित्यावर आयोजित केलेल्या जागतिक पाणमांजर दिनाच्या कार्यक्रमात भारतातुन दै. मुंबई तरुण भारतचे वन्यजीव शास्त्रज्ञ ओंकार पाटील यांचे मार्गदर्शनपर सत्र आयोजित केले आहे.



हे सत्र दु. १ वा. असुन ते ऑनलाईन स्वरुपाचे आहे. त्यामध्ये महाएमटीबीने ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ यांच्या समन्वयाने ‘स्पिशीज ऍन्ड हॅबिटॅट्स अवेअरनेस प्रोग्रॅम’च्या अंतर्गत ‘बुजऱ्या पाणमांजरांचे अद्भुत जग’ हा व्हिडीओ महाMTB वर प्रदर्शीत केला आहे. हा व्हिडीओ जागतिक पाणमांजर दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाणमांजर संशोधक आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शनपर प्रेझेंटेश्न्स होणार आहेत. या कार्यक्रमात ऑटर्ससाठी काम करणाऱ्या जगभरातील संशोधक आणि संवर्धनकर्त्यांचे सादरीकरण आणि चर्चा होणार आहे. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे दै. मुंबई तरुण भारतच्या वन्यजीव संशोधकांसाठी बहुमोलाचा मान ठरला आहे.



इंटरनॅश्नल ऑटर सर्व्हायवल फंड (IOSF) म्हणजे काय?

ऑटर म्हणजे पाणमांजर. पाणमांजर हे दुर्माळ प्रजातींमध्ये आढळणारा सस्तन प्राणी आहे. पाणमांजरांचे रक्षण करणे आणि त्यांचा बचाव करणे या विचारातुन आयओएसएफ कार्य करते. यासाठी जगभरातील स्थानिक समुदायांसोबत काम, त्यांना शिक्षित करणे, माहिती देणे आणि त्यांना प्रोत्साहीत करणे हे, इंटरनॅश्नल ऑटर सर्व्हायवल फंडचे उद्दिष्ट आहे. पाणमांजरांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातुन दरवर्षी मे महिन्यातील शेवटचा बुधवार जागतिक पाणमांजर दिन म्हणुन साजरा केला जातो.


महाएमटीबीने आणि द हॅबिटॅट्स ट्रस्ट यांच्या सम्न्वयाने प्रदर्शित ‘बुजऱ्या पाणमांजरांचे अद्भुत जग’ आणि ओंकार पाटील यांचे हे विशेष सत्र ऐकण्यासाठी खालील संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSciyLpYHZnzWbgg1dJhNpCPB6ExiLQloh1u2PvQg0lR0kcjiA/viewform


Powered By Sangraha 9.0