ही आमची संस्कृती! जडेजाच्या पत्नीनं दोन सेकंदात जिंकली मने!

30 May 2023 16:05:11
 
Rivaba
 
 
मुंबई : चेन्नईने आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले. चेन्नईचा विजय जडेजाच्या नावावर होता. चेन्नईला विजय मिळवून दिल्यानंतर जडेजाची पत्नी रिवाबाला आपले अश्रू आवरता आले नाहीत. इतकंच नाही तर विजयानंतर रिवाबा आपल्या पतीचे अभिनंदन करण्यासाठी मैदानावर पोहोचली, तेव्हा तिने जडेजाच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर त्याला मिठी मारली. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
 
यावेळी रिवाबा खूपच भावूक दिसल्या. आयपीएलच्या वेळी ती अनेकदा स्टेडियममध्ये दिसली. फायनलच्या शेवटच्या षटकात सामना ज्या प्रकारे तापला होता. रिवाबाच्या चेहऱ्यावर त्याचा ताण स्पष्ट दिसत होता, पण गुजरातवर विजय मिळवण्यासाठी शेवटच्या 2 चेंडूत 10 धावांची गरज होती. विजय अशक्य वाटत होता. अशा स्थितीत जडेजाने आपली बॅट खेळून शेवटच्या चेंडूवर एक षटकार आणि नंतर एक चौकार मारून विजय मिळवला. एमएस धोनीनेही जडेजाला आपल्या मांडीवर घेतले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0