दिल्ली हत्याकांड : पीडितेच्या आईने फोडला टाहो; म्हणाली "त्या नराधमाला...."

30 May 2023 14:44:00
Delhi teen's murder case

नवी दिल्ली
: दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका १६ वर्षीय मुलीचा ३६ वेळा चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध त्याच्यावर वार करण्यात आले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. तसेच साहिल सरफराज उर्फ मोहम्मद सरफराज याला पोलीसांनी अटक केली आहे. त्यावर त्याला ठार करा, दुसरा कोणताही मुलगा असे वाईट कृत्य करू नये,म्हणून मोहम्मद सरफराजला फासावर लटकवा,अशी मागणी साक्षीच्या आईने केलेली आहे.

पीडीत मुलगी ही तिची मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना साहिलने वाटेत पीडीतेला अडवून तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर तिच्यावर दगडाने हल्ला केला. सध्या आरोपी साहिल फरार आहे. पोलिसांचे पथक त्याच्या शोधात आहेत.व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, आरोपी साहिलने मुलीला अडवून सुरूवातीला तिच्यावर चाकूने ३६ वार करतो. यादरम्यान लोक तिथून जात असतात, पण साहिलला कोणीही रोखण्याचा प्रयत्न करत नाही.
 
लोकांनी साहिलला थांबवले असते तर कदाचित मुलीचे प्राण वाचले असते. पंरतू काहीवेळाने चाकूने हल्ला करूनही साहिलचे समाधान झाले नसल्याने तो त्या मुलीला दगडाने ठेचून मारू लागतो. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीसांचे फथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी लोकांकडून या प्रकरणाची चौकशी केली असून आरोपीला बुलंदशहातून अटक केली आहे.




Powered By Sangraha 9.0