पहिल्यांदाच मराठी समीक्षकास सत्यजित रे पुरस्कार

    03-May-2023
Total Views |

ashok rane 
 
मुंबई : यावर्षीचा सत्यजित रे पुरस्कार चित्रपट समीक्षक अशोक राणे यांना प्राप्त झाला आहे. या पुरस्काराबाबत विशेष म्हणजे आजपर्यंत हा पुरस्कार कोणत्याही मराठी समीक्षकाला मिळालेला नाही. हा मान अशोक यांनी पटकावला आहे. अशोक राणे यांच्या नावावर विपुल ग्रंथसंपदा आहे. 'सिनेमाची चित्रकथा', चित्र मनातले, अनुभव, चित्रपट एक प्रवास, सख्ये सोबत, व्युज अँड थॉट्स ऑन स्क्रिप्ट रायटिंग व त्यांची ओळख म्हणून गाजलेले, 'सिनेमा पाहणारा माणूस' असे अनेक ग्रंथ अशोक यांनी लिहिले आहेत.
 
यापूर्वी सत्यजित रे स्मृती पुरस्कार प्राप्त कलाकारांमध्ये अरुण वासुदेव आणि षण्मुगडास हे पुरस्कारांचे मानकरी ठरले होते. सिनेमाची चित्रकथा या पुस्तकासाठी त्यांना १९९५ साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांचा अनेकदा राष्ट्रीय पातळीवरही गौरव झाला आहे.