शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे 'या' नेत्याने दिला आमदारकीचा राजीनामा!
03-May-2023
Total Views |
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वेा शरद पवार यांनी दि.२ मे रोजी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजकीय घटनाना वेग आला आणि त्यांचीच प्रचिती म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतोद अनिल पाटील यांनी स्वतांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
सुप्रियाताईंच्या नव्या अध्यक्षा होण्याचे संकेत मिळत असताना आव्हाडांनी हा तडकाफडकी राजीनामा दिला आहे त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. तसेच शरद पवारांनी आम्हाला का विश्वासात घेतलं नाही? , असा सवाल ही जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय.