"अंकल,अब और आगे मत बढना! मैं माफी मांगता हुं !"

29 May 2023 10:18:10
Sunil Deodhar on Rahul Gandhi

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांविरोधात गरळ ओकणाऱ्या राहुल गांधी यांना भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी मार्मिक टोला लगावला आहे. सुनील देवधर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य दिसेल अशी प्रतिमा आणि त्यांच्या पायाजवळ राहुल गांधींचा लहानसा फोटो, पोस्ट केला आहे. त्यात जर सावरकरांनी आपलं पाऊल उचलले तर त्यांच्या पायाखाली राहुल गांधी तुडवले जातील, अशा आशयाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सुनील देवधर यांनी त्या पोस्टला कॅप्शन लिहले आहे की, "अंकल,अब और आगे मत बढना! मैं माफी मांगता हुं!", अर्थात सावरकरांना माफीवीर म्हणाऱ्या राहुल गांधीना सावरकरांची माफी मागावे लागेल हे या पोस्ट मधून देवधर यांना सुचवायचे आहे.

Powered By Sangraha 9.0