नाशिक : येथील हिंदुत्ववादी विचारवंत आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’चे स्तंभलेखक डॉ. प्रमोद पाठक अझरबैजानच्या 15 दिवसांच्या अभ्यास दौर्यावरून नुकतेच भारतात परतले आहेत.
बंगळुरुस्थित प्रख्यात मिथिक सोसायटीने डॉ. पाठक यांचा अभ्यास दौरा पुरस्कृत केला होता. अझरबैजानच्या पुरातत्वीय भारतीय संबंधाचा अभ्यास करणे हा दौर्याचा उद्देश होता.
डॉ. पाठक यांनी बाकु, अझरबैजानची राजधानी, जवळच्या सुराखानी या अग्नितीर्थाला भेट दिली. येथे हिंदू, झरतुष्ट्री पारशी आणि शीख तीर्थयात्रेला जात असत. येथून जवळच मुहंमदी कांडी हे जळता पहाड असलेले पारशी तीर्थक्षेत्र आणि भूगर्भातून चिखल फेकणारे पहाड, कातळशिल्पांसाठी प्रसिद्ध असलेले कोबुस्तान, या ठिकाणांना डॉ. पाठक यांनी भेट दिली.
त्यानंतर ‘सिल्क रोड’वरील महत्त्वाची ठाणी असलेली गांजा, शेकी ही गावे, सूफी ठाणे असलेले शामाखी, हाताने विणल्या जाणार्या गालिच्यांसाठी प्रसिद्ध गाव कुबा, रशियाच्या सीमेलगतचा प्राचीन उलू बंधारा इ. अझरबैजानच्या इतिहासातील महत्त्वाच्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. दौर्यादरम्यान पुरातत्व अभ्यासकांच्याही त्यांनी भेटी घेतल्या.
त्यांनी भारतीय संस्कृती केंद्राच्या प्रमुख आणि हिंदी शिक्षिका सईदाजी यांचा डॉ. पाठक यांनी शाल आणि म. गांधी नाणे प्रदान करून सत्कार केला.