घर घेणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची बातमी!

29 May 2023 14:24:17
 
Building Advertisements
 
 
मुंबई : घर घेणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची बातमी आहे. आता, इमारतींच्या जाहीरातींमध्ये QR Code बंधनकारक असणार आहे. 1 ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये क्यूआर कोड बंधनकारक करण्यात येणार आहे. मार्च अखेरपासून महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोडही द्यायला महारेराने सुरुवात केली आहे.
 
क्यूआर कोड स्कॅन करताच एका क्लिकवर प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्याच बाजुला ठळकपणे हा क्यूआर कोड असणे अत्यावश्यक राहणार आहे. तसे परिपत्रक महारेराने नुकतेच जारी केले आहे.
 
ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आणि ग्राहकांना घरखरेदी करणे सोपे व्हावे यासाठी महारेराकडून विविध निर्णय घेण्यात येतात. त्यानुसार आता प्रकल्पाच्या जाहिरातीत महारेरा नोंदणी क्रमांकासह प्रकल्पाचा क्युआर कोड ठळकपणे नमुद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0