आसाममध्ये पहिली वंदे भारत सुरू

29 May 2023 17:49:18
Prime Minister Narendra Modi Vande Bharat

आसाम
: आसाममधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार संपूर्ण भारतात करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी दि. २९ मे रोजी आसाममधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत या रेल्वेसेवेला सुरुवात झाली. वंदे भारत एक्सप्रेसही गुवाहाटी ते पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी दरम्यान मंगळवार वगळता इतर अन्य दिवशी धावणार आहे. वंदे भारतमुळे दोन्ही शहरात पोहोचण्यासाठी ५ तास ३० मिनिटे लागणार आहेत. दरम्यान गेल्या आठवड्यात मोदींच्या हस्ते उत्तराखंडमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती. आसाम येथे सुरु झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी ऑनलाइन उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0