वन्यजीव संवर्धकांच्या कतृत्वाची 'महाएमटीबी'कडून दखल

28 May 2023 07:12:59
Species and Habitats Warriors Awards 2023

मुंबई
: 'जागतिक पर्यावरण दिना'च्या पूर्वसंध्येला दै. 'मुंबई तरुण भारत' आणि 'महाएमटीबी'ने ‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स - २०२३’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. रविवार, दि. ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता भायखळा (पू.) येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुंनगंटीवार हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील, तर 'एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजीज प्रा. लि.'चे व्यवस्थापकीय संचालक संदीप आसोलकर आणि राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे (भा.प्र.से.) हे अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

दै. 'मुंबई तरुण भारत' आणि 'महाएमटीबी'कडून दरवर्षी 'जागतिक पर्यावरण दिना'निमित्त महाराष्ट्रामध्ये तळागाळात काम करणाऱ्या वन्यजीव संवर्धकांना सन्नामित केले जाते. यासाठी ‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य प्रायोजक ‘एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ आहेत. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ व ‘मिशन लाईफ’ हे सह-प्रायोजक आहेत, तर ‘झी२४ तास’ हे टेलिव्हिजन पार्टनर आणि ‘रेडिओ सिटी ९१.१ एफएम’ हे रेडिओ पार्टनर आहेत. तर, ‘पॉलिसी एडव्होकसी रिसर्च सेंटर’(PARC) हे रिसर्च पार्टनर आहेत.

‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’, ‘अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम’, ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’, ‘कांदळवन प्रतिष्ठान’, ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’, ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय’, ‘सह्याद्री निसर्ग मित्र’, ‘महाराष्ट्र पक्षी मित्र’, ‘वाईल्डलाईफ इमेजेस अँन्ड रिफ्लेकश्न्स’, ‘इंडियन युथ बायोडायव्हर्सिटी नेटवर्क’ आणि ‘नॅचरलिस्ट फाऊंडेशन’ या सहयोगी संस्थांना सोबत घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यंदा प्रथमच ‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स'ची विभागणी ९ श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये ‘बडींग नॅचरलिस्ट अवॉर्ड’, ‘कॉन्झरवेशन कॉन्ट्रीब्युटर अवॉर्ड’, ‘यंग रिसर्चर अवॉर्ड’, ‘कॉन्झरवेशन ऍक्टिव्हझम अवॉर्ड’, ‘हॅबिटॅट काॅन्झर्वेशन अवॉर्ड’, ‘इकोटुरिझम ग्रुप अवॉर्ड’, ‘एक्सेपश्नल फॉरेस्ट स्टाफ अवॉर्ड’, ‘एथिकल नेचर ट्रेल अवॉर्ड’ आणि ‘लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ असे ९ पुरस्कार वितरित केले जाणार आहे.

या पुरस्कारांसाठी ऑनलाईन फॉर्म मार्फत नामांकने मागवण्यात आली होती. यामध्ये २०० हून अधिक नामांकने प्राप्त झाल्यानंतर तज्ञांच्या निवड समितीमार्फत या पुरस्कांरांचे मानकरी ठरविण्यात आले. यात वर्गवारी केलेल्या ९ पुरस्कारांसाठी १३ पुरस्कारार्थी मानकरी ठरले आहेत. यामध्ये काही श्रेणीतील पुरस्कार हे विभागून दिले गेले आहेत. त्यांची ओळख करुन देणारे आणि सविस्तर माहिती सांगणारे वृत्तांत हे २९ मेपासून पुढील अंकात प्रकाशित केले जाणार आहेत. या पुरस्कारार्थींना ४ जून रोजी पुरस्कार वितरीत केले जाणार असून या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहण्यासाठी खालील क्युआर कोड स्कॅन करुन नोंदणी करा.

Powered By Sangraha 9.0