नृत्यांगनेच्या 'त्या' पत्राचा 'सेंगोल'शी काय संबंध?

27 May 2023 11:31:15
dancer-padma-subrahmanyam-narrates-how-her-letter-to-pm-modi-on-the-sengol-led-to-a-historic-event

नवी दिल्ली : नवीन संसद भवनात लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ बसवण्यात येणाऱ्या 'सेंगोल' बद्दल रोज नवीन माहिती समोर येत आहे. त्यातच प्रसिद्ध नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांच्याकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्याच्या या प्रतिकाची माहिती मिळाल्याचे कळते.दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये प्रसिद्ध नृत्यांगना पद्मा यांना 'तुघलक' या तमिळ मासिकातून सेंगोलबद्दल माहिती मिळाली. यानंतर त्यांनी त्या मासिकाचा लेख तामिळमधून इंग्रजीत अनुवादित करून तो पीएम मोदींना पाठवला. या पत्रात त्यांनी पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना हे सांगण्याचे आवाहन केले होते.

सेंगोल हे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक असल्याचे त्या सांगतात. त्यांनी सांगितले की कांची महास्वामी (चंद्रशेखरेंद्र सरस्वती) यांनी त्यांचे शिष्य मेट्टू स्वामीगल यांना सेंगोलबद्दल सांगितले आणि आणि त्यानंतर डॉ. सुब्रमण्यम यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे याविषयीचा लेख वाचून त्यांना सेंगोलबद्दल कळले.पद्मा सुब्रमण्यम सांगतात की, तामिळ संस्कृतीत छत्र, राजदंड आणि सिंहासन या तीन गोष्टी सत्ता हस्तांतरणाच्या वेळी दिल्या जातात. त्यापैकी, सेंगोल हे केवळ सामर्थ्याचे प्रतीक नाही तर न्यायाचे देखील आहे. त्याचे महत्त्व हजारो वर्षे जुने आहे.
 
पीएम मोदींच्या कार्यालयात पद्माचे हे पत्र मिळाल्यानंतर सेंगोलची चौकशी सुरू झाली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स आणि नॅशनल अर्काइव्हजपासून ते त्या काळातील सर्व वृत्तपत्रे आणि दस्तऐवजांच्या तज्ज्ञांची मदत घेतली. पण माहिती संग्रहालयांना पाठवली तेव्हा कळलं आणि सेंगोल अलाहाबादच्या संग्रहालयात ठेवल्याची माहितीसमोर आली.हा सेंगोल बंगळुरूच्या प्रसिद्ध वुम्मीदी बंगारू चेट्टी आणि सन्स ज्वेलर्स आणि डायमंड मर्चंट्सने तयार केले होते आणि १९४७ मध्ये ते बनवण्यासाठी १५ हजार खर्च आला होता. आज सेंगोलचे महत्त्व सर्वत्र बोलले जात असताना, लोकशाहीच्या मंदिरात सेंगोलची स्थापना केल्याने तिचे स्वप्न साकार होत असल्याचे पद्मा सुब्रमण्यम यांचे म्हणणे आहे.



Powered By Sangraha 9.0