‘लव्ह जिहाद’चा गंभीर प्रकार ‘द केरला स्टोरी’मुळे उलगडा

    27-May-2023
Total Views |
Love Jihad case pune

पुणे
: पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये ‘लव्ह जिहाद’चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार वर्षांपूर्वी अवघ्या १६ वर्षांच्या मुलीला फूस लावून पळवून तिच्याशी निकाह करण्यात आला. तिला आधी शिर्डी, दिल्ली आणि उत्तर प्रदेश असे फिरविण्यात आले. मुलीला वाममार्गाला लावण्यात आल्याचेही समोर आले आहे. तिला नमाज, बुरखा धर्मांतरणासाठी सिगारेटचे चटके देण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी मात्र सुरुवातीपासून उदासिन भूमिका घेतली. आरोपीबद्दल संशय व्यक्त करूनही त्याच्याकडे चौकशी करण्यात आली नसल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, पीडीत मुलीचा भाऊ, वहिनी, आई-वडील उपस्थित ‘लव्ह जिहाद’चा गंभीर प्रकार ‘द केरला स्टोरी’मुळे उलगडा होते. पडळकर आणि पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, मंचर येथील धनगर समाजाच्या मुलीला मुस्लीम तरुणाने २०१९ फूस लावून पळवले. दहावीचा शेवटचा पेपर झाल्यानंतर ही मुलगी गायब झाली होती. पोलीस ठाण्यात याबाबत रितसर तक्रार देण्यात आली होती. कुटुंबीयांनी आरोपी मुलाविषयी संशय व्यक्त केला होता. कारण त्याची बहीण पीडित मुलीची मैत्रीण होती. तिनेच त्याची ओळख करून दिली होती. मात्र, पोलिसांनी त्याचे नाव न घेता अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. चार वर्षे आई-वडील आणि भाऊ मुलीचा शोध घेत होते. पोलिसांकडे चकरा मारत होते. मात्र, मुलीचा शोध लागत नव्हता.

दरम्यान, तिच्या कुटुंबीयांनी ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाहिला. त्यानंतर भावाला आपल्या बहिणीचे बरे वाईट झाले, तर नसेल ना असे विचार मनात येऊ लागले. त्यांनी समाजाच्या प्रमुख लोकांशी संपर्क साधला. मुलगी गायब झाल्याविषयी माहिती दिली. सर्वांनी मिळून त्या मुस्लीम मुलाच्या नातेवाईकांकडे जाऊन विचारपूस करायला सुरुवात केली. तेव्हा, मुलगा मंचरमध्ये राहात असल्याची माहिती मिळाली. कार्यकर्त्यांनी त्याला शोधले. त्याच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे तो देऊ लागला.
कार्यकर्त्यांनी जोर लावताच त्याने मुलगी घरी असल्याचे सांगत चावी दिली.

१६ मे रोजी कार्यकर्त्यांनी त्याच्या घरी जाऊन पाहिले असता घराला बाहेरुन कुलूप होते. कुलूप उघडून आत प्रवेश करताच आत मुलीला डांबून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. ती घरात बुरखा घालून बसलेली होती. तिची समजूत काढून घरी आणण्यात आले. हे प्रकरण पोलिसांकडे नेले असता निरीक्षकांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी प्रकरण लावून धरल्यानंतर ‘३७६’व ‘पोक्सो’चे कलम वाढवण्यात आले. या तपासात अनेक त्रुटी आहेत. झोपेच्या गोळ्या देणार्‍या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा. सर्वांना अटक करावी. परराज्यात नेऊन तिच्याशी लग्न केले. बनावट कागदपत्र तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या मुलीच्या अंगावर सिगारेटचे चटके देण्यात आले आहेत. आरोपी, त्याचे आई-वडील, मावशी यांनी तिला गैरप्रकार करायला भाग पाडले आहे. रोज दोन-तीन अनोळखी पुरुष घरी येत असत. तिला झोपेच्या गोळ्या दिल्या जात होत्या. तिला मानसिक धक्का बसलेला असून, ती ‘डिप्रेशन’मध्ये गेलेली आहे. पुरुष पाहिला की ती घाबरते, अशी तिची अवस्था आहे.

माझी बहीण केवळ १६ वर्षांची असताना तिला फूस लावून पळवले. तिच्यावर धर्मांतरणासाठी दबाव होता. जबरदस्तीने नमाज शिकविले. ती काहीही बोलत नाही. आता ती माझ्या पत्नीशी थोडीथोडी बोलत आहे. स्थानिक नेत्यांकडे आणि पोलिसांकडे जाऊनही न्याय मिळाला नाही. हा १०० टक्के ‘लव्ह जिहाद’च आहे. आरोपी मुलाच्या मोबाईलमध्ये अनेक हिंदू मुलीचे फोटो, चॅटिंग आहे. व्हिडिओ आहेत. याचा तपास अद्याप करण्यात आलेला नाही.

पीडित मुलीचा भाऊ


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.