निती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं!

27 May 2023 12:07:15
 
Eknath Shinde
 
 
नवी दिल्ली : निती आयोगाची ही महत्त्वपूर्ण बैठक आहे. निती आयोगाच्या या बैठकीवर बहिष्कार टाकने योग्य नाही. विरोधकांना जी पोटदुखी सुटली आहे, त्याचा इलाज जनता जमालगोटा देऊन करेल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते निती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. निती आयोगाच्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीला मी जात आहे. राज्यात अनेक विकासाचे प्रश्न आहेत. महिलांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आजच्या या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. अशी माहिती शिंदेंनी दिली.
 
शिंदे म्हणाले, "निती आयोगाची ही बैठक अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीवर कोणी बहिष्कार टाकत असेल तर ते योग्य नाही. गेल्या दहा महिन्यांत आम्हाला विकासासाठी मोठी साथ मिळाली." असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0