कालानुरूप बदलत जाणाऱ्या वाचनसंस्कृतीचे स्टोरीटेल वर पडसाद

26 May 2023 16:46:05

sandeep khare 
 
मुंबई : स्टोरीटेलच्या ऑडिओबुक्सच्या माध्यमातून शेरलॉक होम्स च्या कथा पुढील भागात सांगितल्या जाणार आहेत. यासाठी कवी व गीतकार संदीप खरे यांचा आवाज असणार आहे. तर या मौखिक कथांच्या प्रसारापूर्वी त्यांची मुलाखत प्रकाशित झाली आहे. या मुलाखतीत कालानुरूप झालेले बदल आजच्या काळात मांडताना आलेली आव्हाने कशी होती या मुद्द्यावर संदीप बोलत होते.
 
संदीप म्हणाले, "अनेकजण असं करतात की सुरुवातीला कथा वाचून घेतात आणि मग सुरुवात करतात. मला अपवाद करावासा वाटला अशासाठी की ते 'रहस्य, रहस्य, रहस्य आहे ना ते मलाही खेचत जातं. मला जर का ते ऑलरेडी माहित असेल तर कदाचित शिळेपणा येऊ शकेल. म्हणून मी मुद्दामून खूप खोलात जाऊन त्याचा अभ्यास वगैरे केला नाही. कथा जरी त्याकाळची असली तरी ती क्लिष्ट भाषा नक्कीच. त्यामुळे मला नवं वाचताना फार गंमत येत गेली. एखादा रहस्यमय सिनेमा बघावा, तशी कथा सादर केली आहे. यात संवाद भरपूर आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेचा आवाज त्याच्या स्वभावानुसार दिला असून त्यातून मुळात कथा सांगितली आहे."
Powered By Sangraha 9.0